आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि पूज्य मानली जाते.

"

LOGO

या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात.

"

LOGO

पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात, या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे घराघरातील लहान ते मोठे व्यक्ती आषाडी एकादशी चा उपवास करतात.

"

LOGO

या निमित्त विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात पैठणहून एकनाथांची ची पालखी त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची ची पालखी देहूहून तुकारामांची आणि आळंदीहून ज्ञानेश्वरांची ची पालखी हि पंढरपुरास येत

"

शेगाव या ठिकाणावरून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी हि पंढरपुरास रवाना होते. उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

"

LOGO

आषाढी एकादशीनिमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात, स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते.

"